October 16, 2025
News MBR
डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे डॉक्टरेट पदवीने सन्मानित
India Latest News Maharashtra Other

डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे डॉक्टरेट पदवीने सन्मानित

महाराष्ट्रातील खेड (राजगुरुनगर), खरपुडी बु.येथील
पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते, संस्थापक अध्यक्ष अंश फाउंडेशन, समाजसेवक डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे यांना दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पदवी प्रदान कार्यक्रमात मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड फाउंडेशन या संस्थेने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे.
या कार्यक्रमासाठी देशाच्या हरियाणा , महाराष्ट्र , राजस्थान , छत्तीसगढ , तामिळनाडू , उत्तराखंड, बंगाल अश्या अनेक राज्यातून विशेष व्यक्तींना त्यांच्या शिक्षण, अध्यात्म, विज्ञान, कला व समजसेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले . त्यात महाराष्ट्रातून डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे यांना डॉक्टरेट ही मानद उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. निरंजन चंद्रकांत खंडागळे हे गेले ६ ते ७ वर्षापासून वेगवेगळ्या एनजीयो च्या माध्यमातून गरजू, अंध,अपंग मुलांसाठी, महिलांसाठी शिक्षण व इतर सेवा पुरविण्याचे सामाजिक काम करत आहेत, त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, हे काम प्रभावीपने करण्यासाठी त्यांनी स्वतःची ‘अंश फाउंडेशन ‘ही एनजीओ स्थापन केली आहे. त्यांच्या या प्रभावी व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट हा सन्मान बहाल करण्यात आला आहे, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Related posts

Modern School Barakhamba Road Celebrating National Sports Day 2022 on 29th august 2022

DMC Kabeer Tiger

दिल्ली म्यूजिक ,क्लब पेश करता है संगीत सरोवर ।

DMC Kabeer Tiger

Ganga River Dolphin Day

Susmita Dey

“जो पढ़ेगा वही बढ़ेगा ” – विधायक नरेन्द्र गुप्ता

Deepak Pushpdeep

हरियाणा दिवस के उपलक्ष्य में रंग उत्सव का आयोजन

Deepak Pushpdeep

Lok Sabha Secretariat Recruitment 2021: Apply For Content Writers, Social Media Marketing Consultant Posts

newsmbr

Leave a Comment